कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा

कम्फर्ट झोन हा आपल्यासाठी कैदेसारखा असतो. त्यात आपण गुरफटून जातो. फक्त आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणारे लोक एखाद्या कुंडीत किंवा फ्लॉवरपॉटमध्ये लावलेल्या वडाच्या झाडासारखे असतात. एखादे बीज जोपर्यंत त्याच अवस्थेच असते, तोपर्यंत ते सुरक्षित असते, पण रोपटे कमकुवत असते. स्वत:मध्ये अनेक जंगले सामावून ठेवणारे बीजच असते.

बियाण्याचे रोपट्यात रूपांतर झाल्यानंतरही त्यात असंख्य शक्यता दडलेल्या असतात, पण बियाण्याची अवस्था बदलली नाही तर ते तसेच शो आरामदायी आयुष्यात बदल करा आणि जीवनातील उच्च शिखरापर्यंत पोहोचा अन्यथा त्याच सुविधांचा उपभोग घेत आळशी व्हाल. नियोजित पद्धतीने जगणे सोडून द्या. असे पाऊल उचलायला घाबरू नका. दृढ निश्चयी लोकांनीही आजपर्यंत हेच केले आहे. असाच मार्ग पत्करून ते पुढे गेले आणि रस्त्यातील अडथळे दूर होत गेले. बदल करण्यात काहीच जोखीम नसते. किंबहुना बदल न केल्यास जोखीम असते. कारण त्यामुळे आपणे जेथे आहोत, त्याठिकाणीच अडकून पडतो. ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ म्हणजे तुम्ही काय आहात आणि काय बनू शकता हे विसरून जा, पुढे जाण्यासाठी काम करा.

जीवन ही 100 मीटर सरळ धावण्याची शर्यत नसून 110 मीटरची अडथळ्यांची शर्यत आहे. विजेत्यांच्या रस्त्यात अडथळे येत राहतात. त्यांच्यापासून बचाव करणे योग्य नसून ते पार करून उद्दिष्टप्राप्ती करण्यात खरा पुरुषार्थ असतो. आयुष्यात पूर्वी जे कधीच केले नाही, ऐकले नाही, त्या अज्ञात विश्वात स्वत:ला झोकून द्या. एखादे काम आपल्याला अशक्य वाटत असेल, तेसुद्धा काम करून पाहा.

धैर्याने पाऊल उचलत चला. बंडखोरी वृत्ती जागवा आणि आपल्या कम्फर्ट झोनचा विस्तार करत पुढे जा. नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तर तुमचे यश त्या कक्षांना कधीही भेदू शकणार नाही. तुम्हाला कम्फर्ट झोनच्या भिंती पाडाव्याच लागतील आणि जीवनात यश शिखर गाठावे लागेल.

Source:divyamarathi

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *