कर्नाटकमधील काँग्रेसच्या चालींमागे शरद पवारांचा हात!

कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्याआधीच येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. काँग्रेसनं कर्नाटकात खेळलेल्या चालींमागे शरद पवारांचा हात असल्याचं समोर आलंय.

शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतः हे कबुल केलं. पहिल्या दिवसापासून मी या निर्णयप्रक्रियेत होतो, असं शरद पवार यांनी सांगितलं. काँग्रेसने कर्नाटकात झुकतं माप घेतलं का?, या लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या प्रश्नावर ते बोलत होते.

दरम्यान, राज्यपालांनी संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचं काम केलं, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी देखील शरद पवार यांनी केली.

Source:https://www.thodkyaat.com/karnataka-congress-and-sharad-pawar/

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *