प्रेक्षकांना मिळणार ‘पाठशाला’ फेम दिग्दर्शकाची ‘सोबत’

प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्यवेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात.

प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्यवेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटातून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी ‘सोबत’ या चित्रपटातून उलगडणार आहे. अल्पवयीन प्रेमाचा शोध हा चित्रपट घेणार आहे. कश्मिरा फिल्म्स प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला ‘सोबत’ हा चित्रपट २५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सोबत’ ही गोष्ट आहे करण आणि गौरी या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रेमी युगुलाची. गौरीच्या घरून असलेल्या विरोधाला तोंड देत करण तिच्याशी लग्न करतो. त्यानंतर मात्र तो मोठ्या अडचणीत सापडतो. गौरी लग्न केल्यावर करणला कोणत्या आव्हानासा सामोरं जावं लागतं, गौरी आणि करणचं लग्न टिकतं का, असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं या कळानकातून उभे करण्यात आले आहेत. आपल्या आजुबाजूला घडणारा ताजा विषयही अगदी मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

Source:https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-movie-paathshaala-fame-director-milind-ukey-upcoming-movie-sobat-1676752/

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *