हापूसच्या जन्माची आणि बारश्याची कहाणी.

पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोड प्रेमळ भेट म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याचा जम आता जरी कोकणात बसलेला असला तरी त्याचा उगम गोव्या मधील. मग तिकडे उमेदीचा काळ घालवून हवा पाणी माती कोकणातील मानवल्यामुळे कोकणात स्थानापन्न झालेला आणि तेथेच प्रसिद्ध पावलेला.

आता तुम्ही म्हणाल आंबा मूळचा भारतीय उपखंडातील. कित्तेक वर्ष आमच्या सगळ्या क्रिया कर्मात आंब्याला स्थान आहे. भरतातील आंब्याचा इतिहास सुमारे सहा हजार वर्ष पूर्वीचा आहे. भारतात जवळ जवळ सर्व भूभागात पिकणारे हे फळ आहे अगदी जंगल पासून दारापर्यंत सगळीकडे आंब्याची झाडे दिसतात. मग माझी हिम्मत कशी झाली म्हणायची कि ‘पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोडं प्रेमळ भेट…’

तुम्ही म्हणताय ते सारं बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय ते नीट वाचलं तर कळेल. हापूस हि आंब्याची जात एका पोर्तुगीज माणसाने शोधली आणि रुजवली. त्या माणसाचं नाव होतं ‘अफोन्सो द अल्बुक्वेरकु’ (Afonso de Albuquerque). आता तुम्हाला कळले असेल हापूसच इंग्रजी नाव अल्फान्सो का आहे ते (पोर्तुगीज नावात इंग्रजांनी घोळ केला आणि Afonso च Alfonso झालं). अफोन्सो द अल्बुक्वेरकु हा कोणी साधा भोळा शेतकरी नव्हता. तो होता एक प्रसिद्ध समुद्री योद्धा होता. पोर्तुगीज राजाने याला दिलेल्या पदव्या होत्या ‘Captain-Major of the Seas of Arabia, Governor of India (पोर्तुगीजांच्या आमला खालील भारत), First Duke of Goa.’ हा भारताचा दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर होता त्याचा कार्यकाळ होता १५०९–१५१५. खूप धाडसी शूर आणि दर्यावर्दी योद्धा होता त्याने पोर्तुगीजांना गोवा, मल्लक्का, मस्कत, अरब प्रदेश, इथोपिया, पर्शियन आखातातील (Persian gulf) बरेच प्रदेश पोर्तुगीज आमला खाली आणले. तो राजाच्या एवढ्या मर्जीतील होता कि त्याच्या मृत्यू नंतर त्याचा दफन विधी पोर्तुगालच्या राजधानी लिस्बन येथे झाला.

या योध्याला प्रवासात मिळालेली वेगवेगळी रोपे जमा करण्याचात्र त्यांची कलम करण्याचा छंद होता. पुढे गव्हर्न झाल्यावर त्याचा कडे भरपूर वेळ होता आणि जमा केलेली रोपे त्यातूनच त्याचे कलमाचे प्रयोग चालू झाले आणि त्यातच जन्म झाला हापूसचा.

हापूसला गोव्याची हवा मानवली आणि भारतीयांना हापूसची चव. त्यातूनच हापूसचा प्रवास चालू झाला आणि हा आंबा सर्वत्र पोहचला. पण या फळाला दक्षिण कोकणातील हवा पाणी आणि माती जास्तच मानवली त्यामुळे त्याची गोडी आकार आणि सुवास कोकणातील मातीत जास्त खुलला. त्यातूनच हापूस कोकणातीलच फळ आहे असा मानला जाऊ लागलं. हापूस कोकणासाठी वरदान ठरला. त्याच सोबत हापूस जगभरात भारताची ओळख झाला अमेरिका, युरोप, रशिया, अरब देशात हापूसला (कोकणातील) खूप मागणी असते. भारतातून निर्यात होणाऱ्या महत्वाचा माला पैकी हापूस हे एक नगदी पीक झालंय. त्याच सोबत हापूस आज काल एक स्टेटस सिम्बॉल हि होऊन बसलाय.

१) अफोन्सो द अल्बुक्वेरकु
२) अल्फान्सो / हापूस

अशी हि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण…

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *