म्युच्युअल फंड सही हे

सगळीकडे आज टीव्ही वर, रेडिओ वर, वर्तमान पत्रामध्ये, सिनेमा गृहमध्ये “Mutual fund सही है” ही जाहिरात चालू आहे…. mutual फंड सही है…हे कळतंय पण अजून Mutual फंड आणि SIP म्हणजे नेमके काय? यात खूप गोंधळ उडाला आहे.

आज गुंतवणूक क्षेत्रात काम करत असताना खूप बरे वाईट अनुभव येतात…त्यातील एक म्हणजे खुपजण मला SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे म्हणून गुंतवणूक करायला येतात…. त्यांच्यासाठी खासकरून आजचा लेख…. SIP हा कोणता गुंतवणुकीचा पर्याय नाही तर गुंतवणुकीचा प्रकार आहे….हे लक्षात घ्या…स्वतःला आणि आपल्या समाजाला आर्थिक साक्षरतेत पुढे घेऊन चला….

म्युच्युअल फंड : SIP (गुंतवणुकीचा एक पद्धतशीर मार्ग)

गेल्या ५-१० वर्ष्यामधे म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे SIP हा गुंतवणूक पर्याय घरा-घरात पोहचला आहे. त्याबद्दल म्युच्युअल फंड कंपन्या, गुंतवणुवकी बद्दल ची मासिके वर्तमान पत्रे यांचे आभार मानावे तितके कमी कारण भारतीय लोकांना त्यांच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढून  म्युच्युअल फंड यासारख्या शेअर बाजार मधील गुंतवणुकीकडे वळवणे तेवढे सोपे नाही पण आज कुठे तरी मोठा बदल होताना दिसतोय.

आज SIP करायची आहे म्हणून खूप ग्राहक बाजारात येतात गुंतवणूक करतात पण अजून त्यांना
SIP म्हणजे नक्की काय ?
म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय ?
म्युच्युअल फंड किंवा SIP  कशी काम करते ?

SIP  हे गुंतवणुकीचे प्रॉडक्ट नाही तर गुंतवणुकीची पद्धत आहे.

अश्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसते, तेव्हा लक्षात येते कि इथे सुद्धा गुंतवणूकदारांची मानसिकता हि इतर गुंतवणूकि सारखीच आहे. मी जेव्हा विचारतो तुम्हाला SIP  का करायची आहे तर कारणे मिळतात….

माझे सहकारी करतात….
माझा भाऊ करतो….
माझे सर्व मित्र करतात…..म्हणून मला पण सुरुवात करायची आहे.

म्हणजेच काय एक संपत्ती निर्माण करण्याचा हमखास मार्ग आज तुमच्याकडे आहे पण तुम्हला त्याची ताकद माहित नाही हि शोकांतिका आहे. हो कि नाही ? आज अल्लादिन चा चिराग आपल्याला मिळाला तर आपण काय काय मागू ??

तसेच या म्युच्युअल फंड : SIP च्या माध्यमातून तुम्ही खूप काही मिळवू शकता फक्त तुम्हाला या गुंतवणूक पर्याया ची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.आज आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचा SIP हि पद्धत पाहूया.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रकार :

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे म्युच्युअल फंड चे प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पद्धती आहेत जसे कि
Lumsum Investment
Systematic Invesment Plan
Systematic Withdrawal PlanS
Systematic  Transfer Plan
वरील ४ पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. या सर्वातील लोकप्रिय प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड : SIP आणि आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Systematic Invesment Plan म्हणजे नक्की काय?
Systematic Invesment Plan म्हणजे ज्याप्रमाणे आपण बँकेत किंवा पोस्ट मध्ये  दरमहिन्याला RD  अकाउंट ला पैसे भरतो आणि ती छोटीशी रक्कम पुढच्या ५-१० वर्ष्यात एक मोठी रक्कम होते  त्याचप्रमाणे Systematic Invesment Plan नुसार दरमहिन्याला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली जाते. फरक इतकाच हि ऑटोमोटेड सिस्टिम आहे आणि आतपर्यंत आपण दरमहिन्याला ज्या गुंतवणूक करत आलो त्या सर्व आपण स्वतः बँकेत किंवा पोस्टात जाऊन कराव्या लागत होत्या त्यामुळे त्या गुंतवणुकीमध्ये काही त्रुटी होत्या त्या या म्युच्युअल फंड च्या SIP  मध्ये भरून काढल्या आहेत.

म्युच्युअल फंड SIP  करण्याची प्रक्रिया कशी असते ते पाहूया?

महिन्याला किती रक्कम आपण गुंतवू इच्छितो ते ठरवणे
म्युच्युअल फंड कंपनी आणि स्कीम निवडणे
महिन्याची कोणत्या तारखेला बँकेतून पैसे SIP साठी जाणार ती तारीख ठरवणे
किती कालावधीसाठी आपण गुंतवणूक करणार आहोत ते ठरवणे
म्युच्युअल फंड SIP  फॉर्म भरणे

अश्या प्रकारे म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीचा आपण श्री-गणेशा  आपण करू शकतो.

म्युच्युअल फंड SIP चीया काही वैशिष्ठये आपण बघूया :

1. गुंतवणुकीला शिस्त आणते :- दर-महिन्याला डायरेक्ट बँक अकाउंट मधून SIP साठी रक्कम कट होत असल्यामुळे गुंतवणुकीला एक शिस्त प्राप्त होते.

2.चक्रवाढ व्याजाची शक्ती ;- जितका जास्त वेळ तुम्ही द्याल तितके जास्त तुम्ही मिळवलं. एखाद्या ३० वर्षीय व्यक्तीने त्याच्या वयाच्या ६० पर्यंत दर महिन्याला १०००० रुपय गुंतवणूक केली तर पुढील ३० वर्ष्यात त्याचे १५%  जरी परतावा  मिळाला तर त्याचे ३६ लाख गुंतवणुकीचे ७ करोड होतील. हि चक्रवाढ व्याजाची शक्ती आहे.

3.सुलभता :- SIP  मध्ये तुम्ही महिन्याला ५००-१००० रुपये पासून गुंतवणूक सुरुवात करू शकता. ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेट वर मोठा परिणाम होत नाही.

4.रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग :- हे एक गुंतवणुकीचे तंत्र आहे. मार्केट मध्ये तेजी-मंदीचा  फायदा या तंत्रामध्ये होतो. मार्केट खाली असल्यास जास्त युनिट खरेदी करता येतात कारण त्यामुले भाव तुटलेले असतात.

5.प्रत्येक वेळ योग्य वेळ :-शेअर बाजारात अति स्मार्ट गुंतणूकदार शेअर बाजार च्या चढ-उतारावर निरीक्षण कार्य पैसे गुंतवत असतात. जे अजून स्वतः वॉरेन बुफ्फेट  सरांना  जमले नाही. SIP  पर्यायामध्ये हा विषयच राहत नाही कारण मार्केट मध्ये तेजी असो किंवा मंडी गुंतवणूक होत राहते.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा आणि त्यातून आपली आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड : SIP हा एक उत्तम मार्ग आहे.

इथे आपल्याला फक्त आपल्या क्षमतेनुसार महिन्याची रक्कम ठरवायची आहे आणि ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपनीच्या स्कीम मध्ये गुंतवणूक करून त्यावर निरीक्षण ठेवायचे आहे. लक्षात ठेव्हा कोणत्या तरी जॅकपॉट शेअर्स च्या शोधात निघण्यापेक्षा महिन्याला ५०००-१०००० ची गुंतवणूक म्युच्युअल फंड : SIP मध्ये चालू करा दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार असाल तर १५-१६% हमखास परतावा मिळू शकतो. जेणेंकरू तुम्ही महागाई ला तोंड देऊ शकाल.

अधिक माहितीसाठी फोन करा दीपक काटकर 9920562511 | 9323562511

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *