मराठा क्रांती मोर्चा होणार ‘आक्रमक’!

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार चालढकल करीत आहे. त्यामुळे यापुढे शांतता मोर्चा काढणार नाही. भविष्यात मराठा समाजात उद्रेक झाल्यास जबाबदारी सरकारची राहील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केली होती. यावेळी सरकारने मराठा मोर्चानंतर काढलेल्या फसव्या शासन निर्णयाच्या प्रती फाडून टाकण्यात आल्या. केवळ आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गासाठी शासन निर्णय काढले याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

▪ ‘मीच मराठा समाजाचा नेता’ असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाची चळवळ मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून चंद्रकांत पाटील यांना उपसमितीतून हटवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

▪ मराठा समाजातील सतरा-अठरा लोक व चंद्रकांत पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चाशी काहीही संबंध राहणार नाही. यापुढे मराठा क्रांती मोर्चाची कमिटी काम पाहील याची नोंद सरकारने घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले.

▪ 1 मेपासून 5 जून 2018 पर्यंत राज्यभर बैठका, सभा, आक्रोश मेळावे होतील असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकांनंतर तालुका पातळीवर आमदारांना फिरू दिले देणार नाही.

▪ मराठा क्रांती मोर्चामध्ये सरकारने किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने हस्तक्षेप करू नये. मराठा क्रांती मोर्चा हे नाव कोणत्याही पक्ष संघटनेला वापरता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *