कोणत्या कामासाठी किती गुण?

 

‘वॉटर कप’ या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावांना त्यांनी दिलेल्या योगदानानुसार मुल्यमापन करून १०० पैकी गुण दिले जातात. या गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे केली जाते. शोष खड्डय़ांसाठी ५ गुण, नर्सरी/ रोपवाटिकेसाठी ५ गुण, श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, यंत्राचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर यासाठी १० गुण, रचनांची/कामांची गुणवत्ता यासाठी १० गुण, मूलस्थानी/‘इन सिटू’ मृदा उपचार यासाठी १० गुण, पाणी बचत तंत्रज्ञानासाठी ५ गुण, वॉटर बजेटसाठी ५ गुण, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती/विहीर पुनर्भरण/नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी १० गुण देण्यात येणार आहेत.

सहभागी महसुली गाव/ग्रामपंतायतींना निर्देशित घटकांतर्गत एकूण १०० गुणांपैकी पुढीलप्रमाणे गुण दिले जातील.

अनु. क्र.        घटक             गुण
१.     शोष खड्डे
२.     नर्सरी/ रोपवाटिका
३.     श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना २०
४.     यंत्राचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना २०
५.     एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर १०
६.     रचनांची/कामांची गुणवत्ता १०
७.     मूलस्थानी/‘इन सिटू’ मृदा उपचार १०
८.     पाणी बचत तंत्रज्ञान
९.     वॉटर बजेट
१०.    अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती /विहीर पुनर्भरण/ नावीन्यपूर्ण उपक्रम १०
एकूण            १००
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *