love story | जिव्हार भाग : ११

 

 
सकाळ झाली आणि धनुच्या अंगावर काटा आला.पण शाळेत जाव लागणार होतच. तिने स्वतःच आवरल आणि गेली आई जवळ भूक लागली सांगायला. पण आई तिच्याशी बोलली नाही. बाहेर येऊन बाबांकडे बघितल तिने बाबांनीही तिच्याकडे बघून दुर्लक्ष केल. श्रद्धा आत होती. तिच्याशी बोलायला गेली तर तीही उठून बाहेर आली. कोणीच तिच्याशी बोलत नव्हत. एकट-एकट वाटत होत धनुला. रडू यायला लागल. खर तर या क्षणाला तिला शुभमची गरज होती. पण सगळ त्याच्यामुळेच झालेलं आहे. तो नसता आला इथ तर काहीच झाल नसत. आला ते आला मी जा म्हणत असताना पण तो गेला नाही म्हणून धनुला त्याचा राग आला पण क्षणात राग विरला पण.
धनुने डबा घेतला. घेतला म्हणजे आईने टेबलवर ठेवलेला. तिने तो घेतला. रोजच्या सारख आईने काळजीने नीट ठेव. डबा सगळा खा. अस काही सांगितल नाही. धनुने नाष्टा हि केला नव्हता. ती दारात गेली. चप्पल घातली. आणि मागून बाबा आले आणि म्हणाले. चल.
आता रोज शाळेत सोडायला आणि आणायला बाबा जाणार होते. त्यामुळे शुभमच तिला दिसण , दोघांच लपून भेटण सगळ बंद होणार होत. आणि त्यामुळे धनु शुभम ला विसरून अभ्यास करेल अस बाबांना वाटलेलं. दोन आठवडे झाले. रोज येताना जाताना बाबा सोबत बघून शुभमला धनुला भेटता आल नाही.त्याची घालमेल होत होती तिला दुखी झालेलं बघून. पण भेटणार कस? काहीच पर्याय नव्हता. वार्षिक एस.एस.सी. बोर्डचा पेपर होता आता पुढच्या आठवड्यात. धनु अभ्यास करत होती. बहुतेक तिच्या डोक्यातून शुभम गेला होता. कारण दिवसभर शाळा , शाळेचा अभ्यास आणि भरीसभर परीक्षेचा अभ्यास. वेळ कुठ होता तिला शुभमचा विचार करायला. आणि घरातले तिच्याशी पुन्हा बोलायला लागलेले. पुन्हा एकदा तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आता तिला मोडायचा नव्हता.
शनिवार होता. आणि सकाळची शाळा होती. तसच बाबांना हि सकाळच कॉलेज होत. आता सोडायला आई गेलेली. आणि आणायला कोण नव्हत कारण श्रद्धा कॉलेजला होती. आणि आई कामाला गेलेली शाळेत.
मग अशात आज तीच तिला एकटीला यायचं होत. बाबांनी बजावलेल कुठ हि थांबायचं नाही. पवार सरांना तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलय मी. त्यामुळे काहीही केल तरी मला बाहेरून कळत. या वाक्याने तिला खात्री पटली कि आपण काही करू शकत नाही. म तिची शाळा सुटली आणि ती घराकडे निघाली. इकड तिकड कुठ बघायचं नाही. अस ठरवून ती मान खाली घालून चालली होती. आणि अचानक तिला दिसल पुढे लांब एका आंब्याच्या झाडापाशी एक ओळखीचा मुलगा उभा होता. ती मनाला सावरते. आणि पुढ चालायला लागते. तिच्या हृदयाची धडधड वाढते. श्वास थंड होतात. घराचा पत्ता ती विसरते आणि जाते चालत सरळ त्या मुलाजवळ. तो शुभम असतो. ती सावकाश त्याच्या माग जाते. आणि थांबते. तो काय करतोय बघत. झाडावर तो धनु अस नाव लिहितो आणि त्यावर अलगद हात फिरवतो. आणि मग डोळे मिटून त्या नावाला आपले ओठ टेकवणार तोच धनु त्याच्या खांद्यावर हात ठेवते. शुभम दचकतो आणि पटकन काही विचार न करता ते नाव पुसतो आणि माग घाबरून बघतो तर धनु. जीवात जीव येतो त्याच्या.
शुभम : तू आहेस वे . घाबरलो कि मी. कशी आहेस ?
धनु : लागल नाही ना रे तेव्हा तुला ?
शुभम : हे नाही. आई तर ह्याच्याहून जास्त मारते हातात घावल त्याने . चपलीने झाडूने कधी कधी लाटण्याने आहे सवय मला.
धनु हासते. आणि जायला निघते. शुभम माग जातो. पण ती त्याच्याकडे केविलवाणा चेहरा करून बघते. काय ते त्याला समजून जात. तो तिथच थांबतो. धनु घरी येते. आणि खाऊन अभ्यास करायला लागते. एक आठवडा आता सुट्टी होती शाळेला परीक्षेमुळ पण ज्यादा तास ठेवेलेला रोज तीन तास. बीजगणित-भूमिती आणि विज्ञान विषयाचा. एव्हाना बाबांचा तिच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे ज्यादा तासाला तीच तिला जायची मुभा भेटली होती. आणि आज ती ज्यादा तासावरून घरी येताना तिला शुभम भेटला.
visit my blog #WRITHOLIC : artistaajinkya.blogspot.com
 
लेखक : अजिंक्य अरुण भोसले. (  लेख चोरू नये )
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *