jivhar love story |जिव्हार : भाग 10

 

 

सकाळी आई बाबा सांगलीला निघाले. इकड श्रद्धा हि कॉलेजला निघाली. धनुने घर आवरून काढल. आणि स्वतसाठी नाष्टा करायला लागली. नाष्टा झाला. पोहे बनवलेले आणि चहा. दोन्ही खाऊन पिऊन ती अभ्यास करत बसली. वाजले असतील आता बारा वैगरे. आणि दार वाजत. आता दारात कोण असेल ह्याचा अंदाज धनुला नव्हता. कारण आईबाबा एव्हाना जाऊन एक तास झालेला. श्रद्धाचा पेपर होता. त्यामुळे ती येणार नव्हती. मग आहे कोण. तिने आतूनच विचारलं कोण आहे. पण बाहेरून काहीच उत्तर आल नाही. फक्त दारावर हातांने एक थाप मारली गेली. धनुने दार उघडल. दारात शुभम होता.

काही न बोलता त्यान आत निट वाकून बघितल आणि आत आला. धनु घाबरली. तिला घाम फुटायला लागला. कोणी बघितल तर आपली वात लागणार  या भीतीने तिने त्याला विनवणी केली तू जा इथून. पण शुभम जाऊन सोफ्यावर बसला. खिशातली जास्वंदीची दोन फुल आणि एक कॅडबरी तिच्या समोर धरली. धनु त्याच्या जवळ गेली. आणि हातातल त्याच्या घेणार तर शुभमने तिला जवळ ओढल. ती त्याच्या शेजारी कलली.

शुभम : मी आलो आवडल नाहि का ?

धनु : अस काही नाही.

शुभम : मग ?

धनु : मग काय ? काही नाही.

शुभम : येणा जवळ. मला खूप आठवण आली तुझी. म्हणून धाडस करून आलोय इथ.

धनु : पण मी भेटले असते न बाहेर कुठ तरी.

शुभम : हो पण बाहेर कस तरी होत. म्हणजे कोण ना कोण बघण्याची भीती असते. अस घरात कधीतरी कोण नसल कि भेटायला प्रेम करायला काही वाटत नाही. चारभिंतीच्या आत.

धनु : हो. पण तू निघ आता.

शुभम : होका.

धनु : उगीच नको न प्लीज.

आणि एवढ बोलता बोलता आजवरचा सगळा साठलेला बांध शुभम कडून तुटतो.तिला जवळ ओढून तो तिच्या ओठांना इतक घट्ट आपल्या ओठात पकडतो कि. धनुचे श्वास जोरजोरात वाढतात. ती सोफ्यावर माग पूर्ण अंग टाकून देते. तिला काहीच सुचत नाही. तिने डोळे मिटून घेतलेले असतात. शुभमला भान असत. आणि तो उघड्या डोळ्याने तिला बघत कीस करत असतो. अशात. ती त्याला तिच्यावर ओढून घेते. आता दोघांना हि राहवत नव्हत. दोघानांही काहीतरी होत होत.

धनुने शुभमच्या पाठीला इतक घट्ट धरून स्वतःजवळ ओढलं कि शुभमला तिच्या हातातला कंडा रुतायला लागला.

आणि या नादात मगाशी शुभमला बघून धनु बावचळली होती आणि शुभमने फुल देण्यासाठी तिला बोलवल. आणि लगेचच त्यांच्यात प्रेम सुरु झाल. पण एवढ्यात धनुला आठवलच नाही दाराला कडी लावायचं. दाराचा जोरात आवाज येतो. आणि दोघ भानावर येतात. दारात आई आणि बाबा या दोघांना बघतात. शुभम तिच्या अंगावरून पटकन बाजूला होतो. धनु जागेवरच रडायला सुरुवात करते. आईबाबाना जाऊन एक तास झालेला. पण बसमध्ये बिघाड होता म्हणून बस दोन तास नंतर होती. आणि इतक्या उशिरा जाऊन परत एका दिवसात येण शक्य नव्हत म्हणून ते परत आले होते. पण आले ते आले आणि त्यांना हे सगळ काही डोळ्यांनी दिसलं.

बाबा : धनु…………………नुनुनुणु ( जोरात ओरडतात )

बाबा धनु जवळ जातात आणि एक जोरात कानाखाली वाजवतात. शुभम पुरता घाबरून जातो. तो मागून कडेने दाराकडे जातो. पण धनुचे बाबा पटकन जाऊन त्याच्या खांद्याला हिसका देऊन आत ओढतात.

बाबा : कुठ चाललास रे ?

शुभम : कुठ नाही माफ करा मला  काका.

बाबा : तू कुठ जायचं नाहीस. आता तुझ्या डोळ्यांनी बघ धनुला मार खाताना. दोघांची चुकी आहे पण शिक्षा तिलाच मिळणार बघ.

आणि त्यांनी दाराला कडी लावली आतून. खूप मारलं धनुला. त्यांनी. लागेल तिथ हात लागत होता तिला. त्या प्रत्येक फटक्याला आई…ग आवाज येत होता. पण आई मध्ये पडली नाही. धनुचा रडताना आवाज ऐकून दाराची कडी वाजली. दारात पवार सर होते. आई जाऊन दार उघडते.

सर : काय झाल वहिनी ?

आई काहीच बोलत नाहीत. ते आत शिरतात. बाबा धनुला मारत होते. आणि एक मुलगा भिंतीला टेकून उभा रडत होता.

सर : अहो थांबा थांबा कुलकर्णी सर.

बाबा : काय थांबा तोंड काळ केल पोरींनी. बदनाम झालो आम्ही आता. आणि का थांबू ?

सर : काय झाल. नक्की सांगा आधी थांबा हो. काय तरी होईल मुलीला. थांबा.

बाबा : लग्नाला गेलेलो. हिच्या भरोशावर घर टाकून तुम्हाला सांगितल पण नाही लक्ष ठेवा मुलींवर म्हणून. पण हिने काय केल या–या पोराला घरी आणून चाळे करतीय.

सर : मग तिला का मारता ह्याला मारा. ए हरामखोर इथ कशाला आलारे तू ? आमच्या पोरी काय तुला अशाच वाऱ्यावर सोडलेल्या वाटतात का ?

आणि ते त्याला कानाखाली वाजवतात. शुभम रडायला लागतो. धनुला त्रास होत्तो त्याला मारताना बघून. पण तिला जागाच हलता येत नसत. पवार सर खूप मारतात शुभमला.

बाबा : काय नाव आहे याच.  कुठला रे तू ?

सर : अहो माग ओढ्याच्या पलिकड राहतय गाबड. फुल विकत सकाळी आणि दुपारी असे धंदे करतोस का रे ?

अस म्हणून त्याला जोरात कानाखाली वाजवतात पवार सर. शुभम भिंतीवर जाऊन आदळतो. सर त्याचा हाताला धरून ओढत बाहेर नेतात आणि सांगतात धनुकडे बघितल न तर तुझी खैर नाही.

शुभम निघून जातो. पवार सर आत येऊन दाराला कडी लावतात.

सर : काय करत होते. दोघ.

बाबा : सांगताना पण लाज वाटतीय मला. तो तिच्या अंगावर झोपलेला. आणि हि त्याला कीस करत होती.

सर : बर आता तुम्ही शांत रहा. बर झाल वाड्यात कोण नाही. नाहीतर तमाशा झाला असता. आपली मुलीची बाजू आहे. ते पोरग आता नाही फिरकणार इकड. आणि धनुच्या वाट्याला हि नाही जाणार. फक्त तुम्ही आता हि गोष्ट दाबुण टाका.

बाबा : अस कस म्हणता तुम्ही सर. माझ्या मुलीच अख्ख आयुष्य पुढ पडलय. आत्ता वाचाल आम्ही वेळेवर आलो म्हणून. आणि काय भरोसा परत अस काय झाल तर.

सर : नाही होणार धनु तशी नाही आपली. होणा?  नाही ना वागणार अस धनु ?

धनु रडत रडत हो म्हणते. वडिलांकडे तिची नजर जाते. रोज प्रेमाने बघणारे तिचे वडील तिला आज रागाने बघत होते. धनु नजर खाली घेते.

धनुला त्या दिवशी दिवसभर जेवण मिळत नाही. ती झोपून जाते.

 

 

 

लेखक : अजिंक्य अरुण भोसले. 7558356426 ( लेख चोरू नये )

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *