school love story | जिव्हार | ajinkya bhosale.

 

जिव्हार : भाग ०१

 

 

दाराची कडी वाजते. दार उघडल जात. दारात दुधवाला उभा असतो. वीणा दूध घेते आणि दूधाच भरल भांड घेऊन आत स्वयंपाक घरात जाते. एकीकडे दुध तापवत ठेवते आणि दुसरीकडे नवऱ्यासाठी चहा बनवत ठेवते. नवरा बाहेरच्या खोलीत बारावीच्या नोट्स वाचत बसलेला असतो. पेशाने प्रामाणिक शिक्षक असलेले मोहन रोज कॉलेजला जाताना स्वतः अभ्यास करत आणि मग जाऊन मुलांना शिकवत. या विणा-मोहनला दोन मुली होत्या एक श्रद्धा. जी कॉलेज ला असते. सकाळीच ती गेली होती. त्यामुळे आत्ता घरी फक्त धनु होती. धनु म्हणजे लाडान तिला धनु म्हणत पण खर नाव धनश्री होत. ती दहावीत शिकायला होती. तिला शाळेत जायला अजून वेळ होता म्हणून ती आत स्वयंपाक घरात मेथीची भाजी निवडत बसलेली असते.

घरात दोघ आई-वडील शिक्षक त्यामुळे घरात शिस्त हि होतीच. त्याच्यामुळे धनुही शिस्तप्रिय होती. चुकीच वागण्याचा तिला तिरस्कार वाटत. दिसायला खूप सुंदर गोरी. आणि कायम चेहऱ्यावर आनंद दिसणारी अशी धनु. तशी श्रद्धा हि सुंदर आणि शांत होती पण धनु लहान असल्याने तिच्यावर जास्त जीव होता आई-वडिलांचा.

तस हे कुटुंब मूळच सांगलीच पण मोहनची बदली साताऱ्याच्या एका कॉलेजमध्ये झाली. त्यामुळे हे चौघ सातारला भाड्याने घर घेऊन राहू लागली. वीणाची जरी नोकरी सुटली तरी तिच्यातली शिक्षिका गाप राहू देत नव्हती. मग साताऱ्यातल्या एका प्राथमिक शाळेत तिने काम सुरु केल. अशात दोन्ही मुलीना बंधन होती. हौसमौज सगळी व्हायची पण वेळेच बंधन. शाळेत ,कॉलेजला मुलांशी मैत्री करण याला विरोधच होता. त्यामुळे प्रेम वैगरे सगळ स्वप्नातच.

धनुला एका शाळेत दाखल केल. ( शाळेच नाव नाही लिहू शकत ) शाळा सुरु होऊन दोन महिने झालेले. धनुसाठी शाळा आजूबाजूचा परिसर नवीन शिक्षक सगळ अगदी नवीन होत. धनुच्या बोलक्या स्वभावामुळे तिच्या वर्गातल्या जवळ जवळ सगळ्याच मुली तिच्या मैत्रिणी झाल्या. दिवस जात होते. आणि दिवसाचे रंग बदलत होते.

शाळा सुटल्यावर नेहमी सारखी धनु निघाली होती. आड-वाटेन घर जवळ पडायचं तिला. म्हणून ती निघाली होती. आणि चालताना तीच लक्ष गेल रस्त्यावर फळ्याच्या दोन तीन रंगीत खडूने अगदी नक्षीत नाव लिहिलेलं. “धनु”…..

 

 

 

 जिव्हार : भाग ०२

 

ते तीच नाव रस्त्यावर लिहिलेलं बघून धनु गोंधळली. पण तिन विचार केला धनु फक्त ती एकटीच नव्हती तिथ. कारण तिच्या घराजवळ एक मृणमयी नावाची मुलगी राहत होती. तीच एवढ मोठ नाव आणि उच्चार अवघड असल्यानं तिला आजूबाजूचे धनु म्हणत. धनु का तर कारण ति धनु राशीची होती. धनुच्या जीवात जीव आला. हे आपल्यासाठी नाही असा विचार करून तीन पायानं ते नाव पुसलं आणि घरी निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना तिला देशपांडेंच्या दारात असलेल जास्वंदीच झाड लागल पण आज त्याची फुल कोणी तरी तोडली होती सकाळीच. धनुला जास्वंद खूप आवडत. पण आज तिथ फुल नव्हती. अगदी फुल नाही मिळाली तरी ती कळ्या तोडून संध्याकाळी पातेल्यात पाणी घेऊन त्यात रात्रभर त्यात कळ्या टाकत. सकाळी टप्पोरी जास्वंद त्यात फुलत. पण आज कळ्या हि नव्हत्या.ती गेली आडवाटेने. शाळेत निघाली. आणि पुन्हा कालच्या जागेवर तिला तीच नाव दिसलं. “धनु” आणि कालपेक्षा जास्त गडद होत आणि त्यावर टप्पोरी तिला  आवडतात तशी दोन जास्वंदाची फुल ठेवली होती. धनु ने आजूबाजूला बघितल कुणीच नव्हत. आज तिला उत्तर मिळाल. ते नाव त्या धनु म्हणजे मृण्मयीच नक्कीच नव्हत. कारण जास्वंद धनुला आवडत होता. आणि येताना तिला फुल मिळाली नव्हती म्हणजे कुणीतरी तिला प्रत्यक्ष नाही पण अस काहीकरूण देण्याचा प्रयत्न केला होता. ती खुश झाली. तिन ती फुल उचलून हातात घेतली आणि नाव पुसायचं पण कस आणि का म्हणून तिन त्यावर माती टाकली आणि हात झाडून निघून गेली.

अस आठवडाभर चालू होत. त्यामुळे तिन आता देशपांडेंच्या झाडाला हात लावायचं सोडून दिलेलं. रोज तेच ते तीच नाव आणि दोन जास्वंदाची फुल तिला वाटेत मिळत. आणि ते प्रत्येक फुल ती घेऊन शाळेत जात आणि सुकलेली फुल ती एका प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवत होती. पण हे सुंदर अक्षरात नाव लिहिणारा आणि अस तिच्या आवडत फुल देणारा लपून राहिलेला मुलगा होता कि मुलगी होती काय माहित पण कोण होत हे मात्र जाणून घ्यायची धनुला ओढ लागलेली. आणि नेहमीसारखा इंग्रजी सण आला फ्रेंडशिप डे.

धनूची मैत्रीण वैशाली दोघी एका बाकावर बसत. त्यांचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता. त्यामुळे खिडकीतून खाली दोघी बघत होत्या. खाली रस्त्यावर मुल मुली एकमेकांना रंगीत दोरे बांधून मैत्रीदिवस साजरा करत होते. तेवढ्यात वैशालीने धनुच्या हातावर हात मारला आणि खुणावल. आणि दोघी खाली एका बाजूला बघू लागल्या. तिथ एक काळासावळा मुलगा होता. त्यांच्या शाळेतला नव्हता तो पण हातात रंगीत दोरा घेऊन एकटक धनु कडे बघत होता आणि तो जरा पुढ आला आणि…….

 

 

 

 

 

 

जिव्हार : भाग ०३

 

तो मुलगा जरा पुढे आला. त्याच पूर्ण लक्ष धनु कडे होत. त्यान रस्ता पार केला. आणि धनुच्या खिडकी खाली बरोबर आला. धनु आणि वैशाली त्याच्याकडेच बघत होते. तस आज प्रत्येकाच्या हातात एकापेक्षा जास्त ते रंगीत धागे दिसत होते. पण या मुलाच्या हातात एकही धागा नव्हता होता तो एक हातात धरलेला त्यान. धनुला प्रश्न पडला कि बहुतेक याला कोणी मित्र नसेल. आणि असेल तर अजून त्यांनी या मुलाला धागा बांधला नसेल. या विचारात असताना वैशालीने तिला हलवलं “ ग बघ न तो काय करतोय” आणि धनु बघू लागली. धनु ज्या खडकीला दुसऱ्या मजल्यावर बसायची त्याच्या खाली बरोबर रस्त्यावर एक पातळ खांब होता. त्या खांबाजवळ तो मुलगा जातो. आणि त्या खांबाला तो रंगीत दोरा बांधतो. आणि माग होता तिथे रस्ता पार करून जातो.

धनु आणि वैशालीला काहीच कळत नाही. पण ज्या नजरेने तो धनुकडे बघत होता. तिला राहवत नव्हत. तिला त्याच्याकड जाव वाटत होत. पण सुट्टी व्हायला वेळ होती न तेवढ्यात घंटा वाजली जेवणाची सुट्टी झाली. बाकावरची पुस्तक वह्या पेन काही न आत ठेवता धनु वैशालीला घेऊन खाली घाईत गेली. खाली गेली तर खाली मुलांची गर्दीच गर्दी जमलेली. त्यात तो दिसत नव्हता. तिन नजर टाकली सगळीकड. वैशालीही त्यालाच शोधायचं काम करत होती. दोघी रस्ता पार करून पलीकडे गेल्या पण तो नव्हता.

धनु माघारी आली. आणि तिन त्या खांबाजवळ जाऊन त्या रंगीत दोऱ्याला काढाल आणि वैशालीला दिला. वैशालीने प्रश्नार्थक चेहरा केला आणि धनुने तिचा डावा हात पुढ केला. उजव्या हातावर खूप धागे तिला बांधले होते तिच्या मैत्रिणीने पण डावा हात रिकामा होता. वैशालीने तिच्या हातात तो रंगीत धागा बांधला. आणि धनुच्या चेहऱ्यावर एक सुकून दिसू लागल. दोघी वर आल्या. डबा काढून खाऊ लागल्या. धनु तशी डावखुरी होती.  त्यामुळे प्रत्येक घासाच्या वेळीस तिला त्या रंगीत दोऱ्याकडे बघून तो मुलगा आठवत होता.

शाळा सुटली. ती घरी आली. पण अभ्यास कसा तरी उरकून ती झोपली पण तिला झोप येईना. पांघरुणात काळाकुट्ट अंधार होता. गरम होत होत. तरी त्याच्या चेहरा आठवला कि धनुचे श्वास जड आणि त्या गर्मीत हि थंड पडत होते. आणि नकळत उजवा हात त्या धाग्यावर फिरवला जात होता.

सकाळी लवकर उठून ती शाळेत निघाली.त्या मुलाच्या नादात ती रोजच तिच नाव आणि फुल असलेला रस्ता ती विसरूनच गेलेली. पण आज त्या आडवाटेवर तीच नाव नव्हत. ती इकड तिकड बघू लागली पण नव्हत. नाव हि नव्हत आणि जास्वंदीच फुल हि नव्हत. ती नाराज झाली. तशीच पुढ जाताना तिला कालचा तो मुलगा दिसला. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली. तिला वाटल आत्ता जाऊन त्याच्याशी बोलाव. पण एक मुलगी म्हंटली कि खूप सारे विचार करतात मुली.  तिला तीन विचार एकमाग एक आले. एक म्हणजे वडिलांनी ताकीद दिलेली कि मुलाशी कोणत्याच मैत्री करायची नाही.मुल फक्त त्या एका गोष्टीसाठी मुलीशी मैत्री करतात आणि नंतर निघून जातात. आणि आयुष्य बरबाद होत ते मुलींचं. जग नाव ठेवत फक्त मुलींनाच. मुलाला कोण बोलायला जात नाही. आणि मुळात हे वय नाही असल काही करायचं. हे वडिलांचे विचार आठवले तिला. दुसर म्हणजे कालपासून या मुलाच्या विचाराने नकळत जे काही मनात-हृदयात होतंय ते नक्की काय आहे आणि का होतंय ? आणि तिसरा विचार हा कि. ठीक आहे ह्या मुलाचा कालचा वेडेपणा बघून मला ह्याच्याबद्दल काहीतरी मनात होतंय पण त्या मुलाच काय जो माझ नाव रोज रस्त्यावर लिहितो माझ्या आवडती जास्वंदीची फुल ठेवतो. खरतर तो मला जास्त आवडला होता. मग ह्या मुलाच काय ?

मनात नुसता प्रश्नांचा गोंधळ उडाला होता.ती भानावर येते आणि बघते तर तो मुलगा समोर नसतो. ती परत नाराज होते. ती शाळेत जाते.

पण दिवसभर तिच्या मनात एकच विचार चालत होता कि. कालच्या मुलाबद्दल मला इतका आपले पण का वाटतोय आणि तो नाव लिहिणारा कोण आहे ज्याच्यावर मला प्रेम झालय. दोन मुल एक मुलगी आणि एकाचा वेडेपणा एकाचा साधेपणा. एकाला तीन बघितलच नाही आणि एकाला तीन प्रत्यक्ष बघितलंय अशा विचारात आज दिवस पण मोठा वाटत होता. प्रत्येक मिनिट एक तास वाटत होता. पण….

 

लेखक

अजिंक्य भोसले.

पुढे कथा सुरु आहे….

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *