बलात्कार | rape

( नायला हिनोरी नावाच्या मुलीची जुबानी. )
मी नायला हिनोरी. काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात कि त्या नंतर कशालाच काही अर्थ उरत नाही. आणि जिच्या आयुष्यात एका माग एक काहीना काही चालूच असेल तर मग काही बोलायलाच नको. माझे वडील हे , फक्त नावापुरते. जबाबदारी हा शब्दहि त्यांच्या लक्षात नाही आता. प्यारालीसीसन डावी बाजू निकामी झालीय आणि उजवी बाजू दारू प्यायला अजूनहि शाबुत राहिलीय. जेवताना प्यायला पाणी नाही पण दारू लागते. आईन दुसर्या एका सोबत लग्न केलंय. दोन वर्ष झाली घरी अजून तोंड दाखवलं नाही. मी पोटापाण्यासाठी लायब्ररीतकाम करते. मला लायब्ररीतून घरी जाताना रोज तोंड लपवून दारू न्यावी लागते. आणि कामासाठी न उठणारा बाप कुलपाच्या आवाजान कसाबसा उठतो. अशा या घरात मी आणि माझी बहिण सारा, बहुतेक आमच्या दोघींचीच कंडीशन बरी आहे.
मुलाला जशी चोइस असते तशी मुलीना हि असते आणि मला हि आहेच. साराच्या मित्रांकड बघून मला हि वाटत त्यांनी माझ्याशी बोलाव पण ते बोलत नाही. माझ्यात काय कमी आहे काय माहित पण ते बघत नाही माझ्याकड. मग डोक्यात जाते माझ्या सारा…..अस वाटत मारून टाकाव तिला नको ती आणि नको तिचे मित्र .
रोज रोज ची साराची हि नाटक बघून मला नको झालेलं . एकदा तिला मी सुरीन मारायचं ठरवलं .पण नाही जमल. आईडिया फेल गेली पण प्रत्येक वेळीस जाणार नाही. मग वाटल. डोक फोडून माराव पण मनाची तयारी होत नाही. मग करायचं काय मी ?
वाटत मला कि कामावरून घरी आल्यावर आईन विचाराव आज उशिर का झाला. वडिलांचा पुरुषी धाक माझ्यावर असावा. पण अस होत नाही. हि घरची गोष्ट वेगळी आहे पण एक मुलगी म्हणून मला हि मन आहे. आणि मन आहे म्हणजे प्रेम आलच. कुणी तरी आपल्यावर जीवापाड प्रेम कराव आणि त्याच्यावर विश्वास ठेवून माझ अस सगळ त्याला मी द्याव अस कितीदा वाटल होत आणि अजूनही वाटत. मी प्रेम, सेक्स करावा पण मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशीच हे सगळ कराव अस मला वाटत. ज्याच्याशी आपल मन जुळत, ज्याच्याशी आपण लग्न करणार असतो. अशा व्यक्तींनीच फक्त आपल्याला हात लावावा आपल्यालाला जवळ घ्याव अशी एक इच्छा एक मुलगी म्हणून माझी आहे. यात काय माझ चुकत का? त्रास होतो अशा सगळ्या विचारांचा, पण मी काय करू मी विचार करत नाही ते आपोआप येतात. त्यातून स्वप्नात माझ्या मी त्याला बघते. ज्याच्यावर मी प्रेम करते. खर नाही स्वप्नात तरी त्याच्यासोबत मी प्रेम करते मला हव तस. चुकीच काय आहे त्यात. पोर्न क्लीप बघण्यापेक्षा तरी बरच आहे.
समाजाला, कुटुंबाला, आणि स्वताच्या मनाची लाज म्हणून प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून तिची कृती करायची. माणूस म्हणताना त्या शब्दात आपण सगळे गणले जातो. मग प्रत्यक्षात पुरुष आणि स्त्री अशी फोड का केली जाते. सोबतीच्या गोष्टीत दोघ जोडीन आणि हक्क मात्र पुरुषांचाच. आणि तो हि फक्त स्त्रीवरच. खूप राग येतो मला. आणि या साराचा आज हि तिला मारायची आयडिया मी ठरवली पण नको वाटत बहिण आहे माझी. सोबत सेल्फी काढायला आता तीच एकटी उरलीय माझ्यासोबत.
बलात्कार. एक वाईट घटना. खर तर ती समाजासाठी , पण त्या पिडीतेसाठी आयुष्याचा शेवट. खरच का शेवट होऊ शकतो.? भावना मुलींना आहे तशी मुलांना हि आहेच. पण कुठ? कधी? कस? त्या भावनेला हावी होऊ द्यायचं हे मात्र मुलीना प्रत्येक घरी शिकवलं जात. मग मुलाना सांगताना लाज का वाटते. पण इथ वेगळाच विचार चालतो. म्हणजे , बलात्कार झालेली मुलगी भितीन त्रासान कसबस सहन करत असते. पण कुणाला तिची फिकीर नाही. कोण तिचे फोटो काढतो तर कोण तिची ब्रेकिंग न्यूज बनवून दाखवत असतो. कोर्टात कूठ? कसा? कधी? झाला बलात्कार असे उलट सवाल केले जातात , आठवडाभर पेपरच्या फ्रंट पेज ला असणारी बातमी आठवड्या नंतर एक एक पान माग होत जाते. ब्रेकिंग न्यूज-ब्रेकिंग न्यूज अशी बोल्ड अक्षरात लिहिलेली बातमी नंतर खालच्या थोडक्या बातमीच्या पट्टीत धावत असते. माणसाला ती वाचायला पण धड जमत नाही इतकी वेगन ती चालत असते.
पण कोण कधी त्या माणसाला विचारत का? कि बाबा का तू तिच्यावर बलात्कार केला..? का तुझ्या मनात असा विचार आला. का तीच आयुष्य बरबाद केलस? ………नाही.. कोण कस विचारेल. मानसिकताच बदलली नाही.
या समाजात होणारी अशी बदनामी रोखण्यासाठी मुलीन जरी हि गोष्ट लपवून ठेवली तरी ती व्यक्ती पुन्हा पुन्हा अत्याचार करायला मोकळीच. आणि एक गोष्ट हि समजली कि प्रेम बलात्कार दोन्ही तस सारखच. फक्त आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सोबत सेक्स करण म्हणजे प्रेम आणि दुसर्याने अनोळखी माणसांन येऊन मनाविरुद्ध केला तर तो बलात्कार. तस बघायला गेल तर मनाविरुद्ध ती गोष्ट तर नवरा पण त्याच्या बायको सोबत करतो. त्याला हि मग बालात्कारिकच म्हणायला हव …. मग करायचं काय नक्की. वाळीत टाकलेल्या आणि बदनाम केलेल्या या समाजात कुडत झुरत जगायचं कि. बस हे काहीच नको अस म्हणून स्वताला संपवून टाकायचं. असा प्रश्न पडला मला. आणि मला उत्तर मिळाल. आणि मी तेच केल. हे सगळ झाल्या नंतर हि समाज जर प्रेमाला मान्यता देत असेल तर मला मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत एकदा प्रेम करायचय…आणि माझ्या मर्जीने माझ्यावर पुन्हा त्यान बलात्कार कराव अस मला वाटत.

नायला हिनोरी.

लेखक : अजिंक्य भोसले. ( लेख चोरू नये. व्हीयोलेट या माझ्या लघुपटावर आधारित याचे हक्क माझ्याकडे आहेत. )Related image

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *