महिला दिन विशेष.| अजिंक्य भोसले लेख

 

जागतिक महिला दिन आहे. मला वाटत जागतिक पातळीवर महिला दिन साजरा करण्याऐवजी पुरुषांनी मानसिक पातळी निट ठेवून जर महीलेचा आदर केला तर नक्कीच महिला हि सुरक्षित होईल. बाळ-मुलगी-बहिण-प्रियसी-बायको-आई-आज्जी-बाई-महिला अशा विविध नात्यांमधून यशस्वीपणे प्रवास करणारी फक्त स्त्रीच असते. स्त्रीच्यात खूप ताकद आहे. तिने ठरवलं तर जगाचा कायापालट होऊ शकतो आणि सगळ्याचा त्याग केला तर या जगाचा सर्वनाश हि होऊ शकतो. कित्येक पिढ्यान पिढ्या आपण राजा महाराजांचा इतिहास ऐकत आलो ते राजे महाराजे घडले ते कुणा आईमूळ-बायको-प्रियसीमुळ. पण स्त्री कायम उपेक्षित राहिली. तीच कौतुक कुणीच केल नाही.

आज या घडीला होणारे विनयभंग होणारे बलात्कार सामान्य झाले आहेत. दोष दिला जातो त्यांच्या कपड्याला. पण दोष कपड्यांचा नाही दोष आहे पुरुषाच्या मानसिकतेचा. ती बदलली तर काहीच होणार नाही वाईट. स्त्री सुंदर आहे आणि तीच सौंदर्य जर कपड्याने खुलून दिसत असेल तर तिला कपड्यांचं बंधन का ? आधुनिक युगात जगता आणि असे भुरसटलेले विचार का करतात लोक ? त्यामुळे दोष हा स्त्रीच्या कपड्यांचा सतो या विधानाच्या मी विरोधात कैक वर्ष आहे. असो दरोडा चोरी व्हावी तसे हे गुन्हे हर रोज राज-रोस पणे होतात आणि या गुन्ह्याला गप्प पणे निमुटपणे सहन करणारी स्त्री किती संयमी असते हे दिसून येत. ती प्रेम करते मनापासून ती जपते सर्वाना. तिला सर्वांचा कळवळा येतो पण तिला काय झाल तिला काय हव कोणच बघत नाही. माणूस म्हणून घेताना माणूस विसरून गेला कि माणूस म्हणजे फक्त धर्म जाती पोट जाती नसतात तर माणूस म्हणजे नाण्याच्या दोन बाजू एक म्हणजे भक्क बाजू स्त्री आणि दुसरी बाजू म्हणजे दिसायला भक्कम पण अस्थिर आणि दिनदुबळा पुरुष. पण बाजू एकच बघितली जाते. फक्त पुरुषाची.

आज खूप मी पोस्ट वाचल्या राजमाता जिजाऊपासून सावित्री बाई फुले ते अगदी प्रियांका चोप्रा पर्यंतच्या सगळ्या स्त्रियांनी बरच काही केल त्यांच्या बद्दल लिहील होत त्यात. ज्या स्त्रिया त्यांच्या कामात सफल झाल्या त्यांचाच फक्त गौरव चालला आहे म्हणून मी माझ्या आयुष्यातल्या काही खास स्त्रिया ( मैत्रिणी ) बद्दल सांगत आहे त्यांचा गौरव माझ्या लेखातून करण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रियांका एक सुंदर मुलगी आहे. कष्ट करायची धडपड आणि जिद्दी हि तितकीच आहे. एक बालिश विचार असलेली हि मुलगी उत्तम अभिनेत्री आहे. आणि या अभिनयाचा उपयोग ती आनंद मिळवण्यासाठी करते. तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा पाढा वाचला तर तिचा कौतुक कराव तितक थोड आहे आणि अशात हि ती जिद्दीने नेटाने रोजचा एक दिवस एक आव्हान पेलून जगत राहते याचा मला अभिमान वाटतो आणि तिच्या या जिद्दी स्वभावावर आणि तिच्या अभिनयावर माझ प्रेम असून तिचा मी पहिला चाहता आहे. अमृता एक सुंदर मुलगी. दिसायला हि आणि मनाने हि. खूप काही विचारांनि गोंधळलेली पण तरीही तिच्या मनात असलेली जिद्द काहीतरी करून दाखवण्याची ती मला आवडते. उत्तम आवाज असलेली अमृता,  अमृता प्रमाणे छान लिहिते.लेखिकेचा प्रवास तीन सुरु केला आहे काहीतरी नवीन जगाला करून दाखवण्यासाठी. साजिदा.हिच्यात हि जिद्द आहे मोठी स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत काही वर्ष तीन घालवली पण मनापासून त्याचा मागोवा घेत तिचा प्रवास सुरूच आहे. एखाद ठिकाणी कुणाच्या मदतीशिवाय आधाराशिवाय एखादा पुरुष थांबून मागे जाईल पण हीन केलेला निश्चय अजून हि ठाम आहे आणि तिचा स्वतावर विश्वास आहे. श्रद्धा. सुंदर गायिका आणि सुंदर अभिनेत्री. गोड गळ्याच्या या स्त्रीचे स्वप्न हि काहीसे असेच आहे काहीतरी करण्याचे काहीतरी मिळवण्याचे . आणि त्यासाठी तिचे हि जिद्दीने काम सुरु आहे.

या सर्वात आपण बघितल तर जिद्द हि कायम आहे. आणि जिद्द फक्त स्त्रीलाच असते. स्त्रीच करू शकते सर्व. कारण जिद्द चिकाटी असेल तर ते काम सफल होत आणि स्त्रीकडे हे प्रामुख्याने आणि खूप जास्त प्रमाणत आढळत.

आजचा लेख असा काही संदेश देणारा किंवा प्रेमावर नाही पण एक प्रयत्न होता जुन्या स्त्रियांसोबत आताच्या या स्त्रियांना माझ्या लेखातून गौरव करण्याचा. ज्यांचा यात उल्लेख नाही त्यांचा हि मनापासून मी आदर करतो. आणि ज्यांचे यात नाव आहे अशा कलाकार स्त्रियांना मी वंदन करतो.

जागतिक न म्हणता मी पुरुष आहे या नात्यान पहिल्यांदा माझ्याच मानसिक विचारात बदल करून खऱ्या मनाने मी सर्वाना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो.

 

 

 

तुमचाच

अजिंक्य भोसले. ( लेख चोरू नये )

Please follow and like us:

2 Comments on “महिला दिन विशेष.| अजिंक्य भोसले लेख”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *