प्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०५ | Ajinkya Bhosale Articles

 

 

पावसाने जोर धरला आणि त्याच्या मनात बरेच प्रश्न यायला लागतात. मघापासून तो तिच्या जवळ जाण्यासाठी आसुसलेला असतो. पण तिच्या एका वाक्यान त्याच्यातली सगळी मिलनाची भावना विरून जाते. आणि त्याच लक्ष तिच्याकड लागून राहत. पण प्रतीक्षा मान खाली घालून हातातली बांगडी माग सरकवत एक सारख त्या बांगडीला बघत राहते.

काय झाल सांग ना ? काय उपाय आहे ? काय करू मी म्हणजे मी तुझा होईन आणि तू माझी होशील ? आता असा अंत नको बघू प्रतीक्षा प्लीज बोल. बाहेर पावसाच पाणी आणि इथ माझ्या डोळ्यातल पाणी दोघ हि आतुर आहेत बरसायला जोराने. ( अजिंक्य )

मला एकदा मिठीत घेशील अजिंक्य ? प्रेमाने नाही असच. गरज वाटतीय. ( प्रतीक्षा )

हे काय आता मधेच ? मी इतका वेळ ठेवला न संयम मग हे काय बोलतियस आणि तू उपाय सांग मग घेईन ( अजिंक्य )

सांगते न तू घे तर जवळ. तू घेणारेस का नाही ? आणि गरज मलाच आहे अस नाही तुला हि आहे तुझ्या डोळ्यात आल्यापासून दिसलय मला. आणि नसेल घ्यायचं तर मी हि नाही उपाय सांगणार ( प्रतीक्षा )

अजिंक्य तिला जवळ घेतो. दोघ खाटेवर बसलेली असतात. अजिंक्य पाय खाली सोडून आणि तिच्यापासून लांब जरा बसलेला असतो तिच्याजवळ सरकून तिला जवळ ओढतो खांद्याला धरून. आणि ती मांडी घालून बसलेली असते खाटेवर.

असली कसली रे तुझी मिठी?  निट धर काय झाल इतका वेळ उतावळा झालेलास. काय करू आणि काय नको माझ्यासोबत अस तुझ्या मनात चाललेलं आणि आता हे काय आता संपली का भावना ? ( प्रतीक्षा )

अजिंक्य उठतो आणि तिचा हात धरून तिला उठवतो. ती त्याच्याकड आणि तो तिच्याकड बघतो. पण तो तिला मिठीत घेत नाही ती त्याच्या जवळ जात नाही दोघांचे दोन हात फक्त एकमेकांच्या हातात गुंतून पडतात.

प्रतीक्षा, या मधल्या काळात मी मिठी मारली उशीला तू समजून. आरशात बघून स्वताशी बोललोय तू समोर आहेस मानून. माझ्या हातावर मीच हात फिरवला तुझा स्पर्श समजून. आणि आज या घडीला तू समोर आहेस पण नाही ग इच्छा होत. काहीतरी राहिल्यासारख काहीतरी हरवल्यासारख वाटतय . माझ मन आज तुला शोधत कुठ गेलय काय माहीत आणि तू माझ्या अशी पुढ्यात आहेस. काय करू मी डोळ्यातल पाणी अडवू? का गच्च मिठीत साठवू? का माझ्या मिठीत धरून ठेवू इतक घट्ट कि दोन श्वासांशिवाय आपल्या काहीच त्या मिठीत ये जा करू शकणार नाही ? काय करू मी ( अजिंक्य )

मला तुझ बनव आज. पुन्हा एकदा नव्यान माझ्यावर प्रेम कर. विसर मला मी कोण आहे. विसर पाहिलं प्रेम. विसर त्या आठवणी. बस फक्त तू आणि मी आहोत इथ इतकच ध्यानात ठेवून मला आपलस कर.हेच हवाय न तुला ? मी तयार आहे. मी जाणार होते पण पाय निघत नाही इथून. तुला हात लावला तर अनोळखी वाटलास रे. आणि मी नाही तुला अनोळखी म्हणून लक्षात ठेवू शकत तू माझा आहेस. तू माझ पहिलं प्रेम आहेस. मला माहित नाही तुझी मर्जी असो नसो मला तुझ बनव लवकर. मी चुकीची वाटत असेन पण हि वेळ पुन्हा नाही येणार आणि बहुतेक मी पण नाही येणार परत. तीन वर्षांनी आज आपण भेटलोय असा जर वेळ लागणार असेल एका भेटीसाठी तर मी फक्त तुझ्या मिठीला नाही आठवण बनवू शकत. मला तू हवायस. तुझा स्पर्श माझ्या प्रत्येक अंगाला आणि तुझा जड झालेल्या श्वासाला मला माझ्यात ओढून घ्यायचय.  ( प्रतीक्षा )

अजिंक्य भरल्या डोळ्याने तिला बघतो आणि तिच्या डोळ्यातल पाणी कधी तिच्या हनुवटी वरून घरंगळत जात कळत नाही. तेवढ्यात बाहेर मोठा प्रकाश पडतो. अजिंक्यच्या काचेच्या खिडकीवर तो प्रकाश स्पष्ट दिसतो पण हे दोघ एकमेकांच्या डोळ्यातच रमून असतात. आणि एकच जोरात आवाज येतो वीज चमकल्याचा. अजिंक्य भानावर येतो आणि त्या सरशी प्रतीक्षा त्याच्या मिठीत घाबरून जाते. घाबरायला ती काय आता लहान नाही पण मिठीत शिरायला एक चांगला बहाणा तिला मिळाला. अजिंक्यच्या शर्टाला घट्ट ओढून धरत तिन त्याला मिठी मारली आणि त्यान तिच्या केसात हात नेऊन ताकदीन घट्ट केस ओढून तिला जवळ ओढलं आणि नेहमी सारखी पावसाचा जोर वाढल्या मुळ लाईट गेली. आणि …………….

 

( कथा संपवायची आहे मला पण आवर नाही घालू शकत माफ करा पण याचा शेवट लवकरच लिहीन. कसा वाटला लेख नक्की सांगा. )

 

 

 

लेखक  : अजिंक्य भोसले. ( लेख चोरू नये )

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *