‘या’ चहाविक्रेत्याची कमाई ऐकून थक्क व्हाल!

 

एका सर्वसामान्य चहाविक्रेत्याचं महिन्याचं उत्पन्न किती असू शकतं? १५-२० हजार.. जास्तीत जास्त ३० हजार…असाच विचार करू शकतो. पण पुण्यातील एका चहाविक्रेत्याची कमाई ऐकून-वाचून तुम्हीही चक्रावून जाल!…होय हा चहाविक्रेता महिन्याला तब्बल १२ लाख रुपये कमावतो. आश्चर्य वाटलं ना!

पुण्यातील ‘येवले टी हाऊस’…चहा पिणाऱ्यांचं हे खास ठिकाण. शहरातील काही प्रसिद्ध चहा स्टॉल्सपैकी हे एक आहे. चहा विक्रीतून दरमहा १२ लाख रुपये कमाई होते. या चहाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करायची आहे, असा सहमालक नवनाथ येवले यांचा मानस आहे. ‘चहा विक्रीचा व्यवसाय भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार देत आहे. या व्यवसायातून चांगली कमाई होत आहे. त्यामुळे मी खूश आहे,’ असं येवले यांनी सांगितलं.

source:https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/tea-seller-sets-benchmark-by-making-12-lakh-per-month/articleshow/63154793.cms

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *