प्रेमाची शप्पथ आहे तुला.

 

उगीच कोणी कुणासाठी काहीच करत नाही. समाजात आपण राहतो. हा समाज आपल्याला चांगल बोलतो म्हणून सबंध हा समाज चांगला आहे अस होत नाही. काही वेळा आपण फसलो जातो त्यांच्या शब्दात किंवा आपणच धोका आहे दिसत असताना फसवून घेत राहतो स्वताला. काहीस असच होत न आपल प्रेमात ? म्हणजे प्रेम हे खोट आहे. क्षुल्लक आहे. आपल्याला कोणी तरी प्रेमात फसवणारे किंवा आपण यात फसलो जाणार आहे हे माहित असताना पण आपण प्रेम करतो. मग मला सांगा प्रेमात हरताना चूक कुणाची असते आपली ? का पुढच्या व्यक्तीची ?

काहीस असच झाल. काहीश्या गैरसमजामुळ अजिंक्य आणि प्रतीक्षाच प्रेम कुठल्या कुठ मनाच्या एका कोपऱ्यात जाऊन लपल. त्या लपलेल्या प्रेमाला अचानक जाग आली तिला काल रात्री पावसात आडोश्याला बघून. अजिंक्य प्रतीक्षा भेटले दोन वर्षांनी. आणि दोघांनी आज अजिंक्यच्या घरी भेटायचं ठरवलं. वेळ होत आली. वेळ होऊन गेली तरी ती आली नाही.

दोष त्याचा नाही. दोष तिचा नाही. दोष नशिबाचा हि म्हणता येणार नाही. काय करणार ती ? स्वताचा संसार आणि त्यात असलेले तिचे आई-बाबा , नवरा , मुलगी यांना काहीं न सांगता , घरातली सगळी काम सोडून ती त्याच्याकड जाऊ शकत नव्हती. तिला माहित होत. इतक्या वर्षाची मनातली सगळी व्यथा तो फक्त बोलून दूर करेल ? शक्यच नाही. शरीराचा संबंध येईलच. पण मी सावरेन स्वताला. तो जवळ आला तरी त्याला जाणीव करून देईन माझ्यावर हक्क नवऱ्याचा आहे त्याचा नाही. अशा विचारात प्रतीक्षा होती. आणि इकड वेळ निघून जात होता तसा अजिंक्यच्या अंगातल अवसान निघून जात होत. वेळ निघून गेली. १ वाजताची वेळ. आता कुठे सहा वाजायला आले. प्रतीक्षा आली नाही. अजिंक्यने कागद पेन्सिल घेऊन उगीचच मनाला शांत करायला कविता लिहायला लागला.

पण कविता हि लिहावी लागते बोलावी नाही लागत. त्याला गरज होती बोलून मन मोकळ करायची. पण ते झाल. नाही. ढगाळ वातावरण झाल पुन्हा. वार येत होत. बाहेर कुठे लोकांचे आवाज येत होते. रोजच येतात पण आत्ता अजिंक्यच्या डोक्यात त्या आवाजाने खूप दुखत होत. मनातला त्रास कसा बाहेर काढायचा हेच नेमक त्याला समजत नव्हत. त्याने लिहिलेली कविता फाडून टाकली. आणि कागदाचे तुकडे खाली टाकले. त्यात त्याला “फक्त तुझ्यासाठी प्रतीक्षा” अस लिहिलेला एक तुकडा दिसला. तो उचलून टेबलावर ठेवला. आणि डोळ्यातल्या पाण्याने कधी त्याचे ओठ खारट केले समजलच नाही.

एक कसला तरी आवाज आला. आणि त्याच्या डोक्यात जोरात एक कळ आली. आणि पुन्हा तसाच आवाज आला. त्यान दुर्लक्ष केल. पुन्हा तीन-चार वेळा सलग आवाज आला. आता जो कोणी हा आवाज करतोय त्याचा जीवच घ्यायचा या विचाराने तो डोळे पुसत दाराजवळ गेला. तो आवाज कडी वाजवल्याचा येत होता. त्यान दार उघडल. मन ताळावर आल. दारात प्रतीक्षा होती. ती आत आली. त्यान दार उघडच ठेवलं. जेणेकरून तिला सुरक्षित वाटाव. पण तीनच सांगितल दार लाव.

तिला टेबलावरचा कागद दिसतो “फक्त तुझ्याचसाठी प्रतीक्षा” अस लिहिलेला. तू अजून करतोस कविता ? माझ्यासाठी ? तीन डोळे मिटले आणि टपकन डोळ्यातल पाणी पडल. आणि कशाचा हि वेळ न घेता तो बोला मी अजून जगतोय हि फक्त तुझ्याचसाठी.

 

 

 

लेखक

अजिंक्य भोसले.

( लेख चोरू नये. )

Please follow and like us:

One Comment on “प्रेमाची शप्पथ आहे तुला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *